भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ

ananta janmichen punya bahut | tain dekhe pandharinath

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनंता जन्मीचें पुण्य बहुत । तैं देखे पंढरीनाथ ॥१॥ वायं शिणताती बापुडी । काय गोडी धरुनी ॥२॥ पाहतं विठ्ठलाचें मुख । हरे सर्व पाप निवारें दुःख ॥३॥ एका जनार्दनीं विठ्ठल उभा । त्रैलोक्याचा गाभा विटेवरी ॥४॥