भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं । वाउग्यां न लागूं मार्गासी

amuchya svahita amhin jagun | vaugyan na lagun margasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं । वाउग्यां न लागूं मार्गासी ॥१॥ करुं पुजन संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥ तुळसीमाळा घालुं गळां । मस्तकीं टिळा चंदन ॥३॥ मुद्रा अलंकार भूषण । करुं कीर्तन दिननिशीं ॥४॥ एका जनार्दनीं न सेवूं आन । वाहूं आण देवाची ॥५॥