भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा

amuchya nijasukhadhama | tujhen charan purushottama

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हांवरी कृपा करा । उद्धरा दातारा दीनासी ॥२॥ देऊनियां नाम कीर्ति । वसवा मूर्ति हृदयीं ॥३॥ एका शरण जनार्दनीं । ठाव मागतसे चरणी ॥४॥