भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे

amuchi to evadhi as | houn das hariche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे ॥१॥ मना मागें न जाऊं देखा । सांपडला शिक्का उत्तम ॥२॥ त्रैलोक्याचा धनीं देव । आम्हा भेव नाहीं कोठें ॥३॥ जाहलों बळिये शिरोमणी । एका चरणीं जनार्दनाचें ॥४॥