भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन

amuchen hechi sadhan kharen | nam baren janardan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥ नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥ नाहीं येणें जाणें मरण धाक । अवघा एक जनार्दन ॥३॥ एका शरण जनार्दनीं । जनार्दन जनीं वनीं ॥४॥