भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं

amrutachi kshir brahmandabhuvanin

अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं । पाहाती त्रिभुवनीं नवल झालें ॥१॥ नाद विंदा भेटी झाली कवण्या रीती । शुध्द ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥ प्रकृति पुरुष शिव शक्ती भेद । त्याचे शरीरीं द्वंद देह जाणा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे पिंडी शोध घ्यावा । ब्रह्मांडी पाहावा ब्रह्म ठसा ॥४॥