भजनी मालिका
← भजनांकडे परत

अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी

amrut godiye nahin bhinnapan | prabha ravikirna jayapari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जयापरी ॥१॥ अळंकार सोनें काय तें वेगळें । डोळियां बुबळें वेगळिक ॥२॥ नभा अवकाशा कोण भिन्न करी । वस्त्रतंतुपरी देव भक्त ॥३॥ निळा म्हणे प्राण तोचि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एकएका ॥४॥