भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें

amhin dharak namache | amhan bhay nahin kalanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं धारक नामाचे । आम्हां भय नाहीं काळांचें ॥१॥ ऐशीं नामाची ती थोरी । कळिकाळ दास्य करी ॥२॥ येरा अवघिया उद्धार । नाममंत्र परिकर ॥३॥ एका जनार्दनीं पोटीं । नाम गावें सदा होटीं ॥४॥