भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला

amhi yasi navas kela | shekhin kama barach ala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्ही यासी नवस केला । शेखीं कामा बराच आला ॥१॥ आम्ही पाहुं पुत्रसुख । हा तो दावितसे दु:ख ॥२॥ आमुचें जाईल दारिद्र्य जन्मांचें । ऐसें मनीं होतें साचें ॥३॥ एका जनार्दनीं कष्टी । येणें पुरविली पाठी ॥४॥