भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे

amhi ton jiven vench kela | tumachya bolavari deva tanv ten tumhasi thave

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥ किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥ जैसी असो तैसींचि तरी । कायसी थोरी मग तुमची ॥३॥ निळा म्हणे वांयांचि शीण । केला यावरुन दिसतसें ॥४॥