भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें

amhi ton apulen nivedilen payin | antariche nahin vanchiyelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥ तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥ सोडविलीं ऐसीं बहुतें अनाथें । अनुसरतां नामातें तुमचीया ॥३॥ निळा म्हणे मीही झालों शरणागंत । ऐकोनियां मात मागिलांची ॥४॥