भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें

amhi lenkuren lalevaden | tumachin taisin tyahi pudhen | krida karuni vade koden | yeun bhetoniyan vorasen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥ नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥ तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामाभेटी जातां काय आमुची इच्छितो ॥२॥ तुम्ही न धरावा संशय । तेथें आम्हां नाहीं भय । मामा भेटी जातां काय । उव्देग घडती भाचिया ॥३॥ ते म्हणती रे नव्हे कृष्णा । तुम्ही त्याचा भावार्थ नेणां । कालिची पहा पां पूतना । आली होती घातावया ॥४॥ केवढी दाऊनियां माया । बसलीं तुंतें स्तन धावया । कृष्णा म्हणे मी धालों तिचिया । स्तनपानेंची आजिवरी ॥५॥ तिणें वेचोनियां कायाशक्ती । आम्हांसि तोषविलें प्राणांतीं । उपकार तिचेहि श्रीपती । म्हणे मुखें मी काय वानूं ॥६॥ निळा म्हणें बोलो‍नि ऐसें । न रहातीचि चालिले उददेशें । गोपिका गौळणीही ऐकोनि ऐसें । आल्या धांवत हरिपाशीं ॥७॥