भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा

amhi konavari satta | karavi ba pandharinatha | hoil sahata duja | tattvata to sanga

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
आम्ही कोणावरी सत्ता । करावी बा पंढरीनाथा । होईल साहाता दुजा । तत्त्वता तो सांगा ॥१॥ तूंचि बळिया शिरोमणि । आहेसि या त्रिभुवनीं । देवाधिदेव मुगुटमणि । कींव भाकणें यासाठीं ॥२॥ केला माझा अंगिकार । आतां कां करितां अव्हेर । तुमचा तुम्ही साचार । करा विचार मायबापा ॥३॥ जन्मोजन्मींचा पोसणा । तुमचाचि नारायणा । भाकितों करुणा । आना मना चोखा म्हणे ॥४॥