भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं

amhansi ti mukhya santaseva praman | viththalakirtan vachen gaun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं ॥१॥ दुजे नेणों स्वप्नीं विठठलवांचुनीं । जनीं मनीं निरंजनीं देखा हेंचि ॥२॥ संताचियां पायीं मस्तक ठेवून । आवडी चरणा विठ्ठलांच्या ॥३॥ एका जानार्दनीं जनार्दन एकपणीं । विठ्ठलां वाचूनीं दुजें नेणों ॥४॥