भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां सकळां देखतां । पुरवी लळे तो सर्वथा

amhan sakalan dekhatan | puravi lale to sarvatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हां सकळां देखतां । पुरवी लळे तो सर्वथा ॥१॥ जें जें मागावें तयासीं । तें तें देतो निजभक्तांसीं ॥२॥ न मने अंकिताचा शीण । राहे द्वारपाळ होऊन ॥३॥ घोडे धूतले रणांगणीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥