भजनी मालिका
← भजनांकडे परत

अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांहीं तरी भजन करी वाचे

alpa ayushya naradehin jan | kanhin tari bhajan kari vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अल्प आयुष्य नरदेहीं जाण । कांहीं तरी भजन करी वाचे ॥१॥ जाणार जाणार नरदेह जाणार । न चुकेक वेरझारा जन्ममृत्यु ॥२॥ करी धंदा आठवी गोविंदा । वायां तूं आपदा नको घेऊं ॥३॥ एका जनार्दनीं पंढरी पाहून । तेथें करी मन ठेवणें देखा ॥४॥