भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलिया जवळा भक्तिसुख देखे

aliya javala bhaktisukh dekhe

आलिया जवळा भक्तिसुख देखे । पालव पोखे वाणिव भोगी ॥१॥ तें सुख आम्हां विठ्ठलचरणीं । निवृत्ति करणी व्यासाचिये ॥२॥ जप तप ध्यान क्रिया कर्म धर्म । रामकृष्ण नेम गुरुभजनें ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे संसार निरसी । अखंड मानसीं विठ्ठल हरी ॥४॥