भजनी मालिका
← भजनांकडे परत

आल्हादपण काय सांगशी देवा

alhadapan kay sangashi deva

आल्हादपण काय सांगशी देवा । मन बैसें भावा तैसें करी ॥१॥ हा घोडा हा राऊत करुनि दाखवा । मग पदीं बैसवा ब्रह्माचिये ॥२॥ मी डोलेन आनंदे तुमचेनि प्रसादें । रत्न जेंवि अंधें देखियेले ॥३॥ करा तत्त्वीं सौरसु म्हणे निवृत्तिदासु । जेथें रात्री दिवसु अथिचिना ॥४॥