भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं

alen sharan tyacha kari pratipal | na mhane ha durbal sadaiv kanhin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आलें शरण त्याचा करी प्रतिपाळ । न म्हणे हा दुर्बळ सदैव कांहीं ॥१॥ नेदी लागों वारा कल्‍पनेचा तया । न वजे पासोनियां दुरी कोठें ॥२॥ ब्रम्हरस मुखीं घालीं नामामृत । नेदी तुटों आर्त आवडीचें ॥३॥ निळा म्हणे यासी भक्ताचा अभिमान । उभा म्हणऊन युगें जातां ॥४॥