भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक

ale sannyasi tapasi | yogi munijan prantavasi | pandit puranik jyotishi | vedabhyasi yadnyik

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आले संन्यासी तापसी । योगी मुनिजन प्रांतवासी । पंडित पुराणिक ज्योतिषी । वेदाभ्यासी याज्ञिक ॥१॥ श्स्त्रपाणि रिक्तपाणी । पहाति कृष्णातें ते दुरुनी । अवलोकूनियां निज नयनीं । परम विस्मयातें पावती ॥२॥ घरें सांडूनियां नारी । आल्या कोणीचि नसतां घरी । म्हणती सवेंचि जाईल गे श्रीहरी । आम्ही त्या दृष्टीं न देखतां ॥३॥ मग जे उव्दिग्न व्हावें मनीं । तें आतांच कां न यावें पाहोनी । ऐशिया निश्रचयातें करुनी । आलिया एकांतवासीहि त्या ॥४॥ जिया बाहेरी येणेंचि नाहीं । आपुलिया सभाग्यपणें कदाही । आल्या धांवोनियां त्याहीं कृष्णा दृष्टी अवलोकूं ॥५॥ निळा म्हणे घरा भाग्य । आलिया अव्हेरी कोण त्या मग । अधिकाअधीक लाहो सवेग । करुनियां संग्रहिती ॥६॥