भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले भेटी संत जन । गर्जे गगन हरिनामें

ale bheti sant jan | garje gagan harinamen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आले भेटी संत जन । गर्जे गगन हरिनामें ॥१॥ टाळ विणे मृदंग भेरी । छविने अंबरीं झळकती ॥२॥ विठ्ठल देव धांवती पुढें । भेटती कोडें जिवलगा ॥३॥ निळा म्हणे आलिंगनें । नव्हती भिन्न वेगळे ॥४॥