भजनी मालिका
← भजनांकडे परत

आलासि कोठोनि जासिल कोठे

alasi kothoni jasil kothe

रचनाकार: संत बोधले · अभंग
आलासि कोठोनि जासिल कोठे। होतात कवणे ठायी रे ॥१॥ मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे । ऐसिया प्रकारे भुलले जन । पावन करित काही रे ॥ २ ॥ सद्गुरुसारिखा मातापिता बंधू । भावे शरण त्यासी जाई रे ॥३॥ आशा मनसा तृष्णा कल्पना सर्वही । घातल्या पाई रे ॥४॥ ऐसा जाणि जे तो साधी भूत विश्वम्भरा। मनुषे देह तेथे नाही रे ॥५॥ बोधला म्हणे ऐसा शरण जाई । मग तरसिल संदेह नाही रे ॥६॥