भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष

alaksha agochar mhanati vruksha | to drushti na dise saksha | yogi mhanati pahila laksha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अलक्ष अगोचर म्हणती वृक्ष । तो दृष्टी न दिसे साक्ष । योगी म्हणती पाहिला लक्ष ॥१॥ कान्होबा तुझें कोडें । तुजपुढें केलें उघडें । सांगतां वेद जाहले वेडे रे ॥२॥ सहा अठरांची मिळणी । छत्तिसांचें घांतलें पाणी । तो वृक्ष देखिला नयनीं रे ॥३॥ पंचाण्णवची एक शाखा । एका जनार्दनीं वृक्ष देखा । अर्थ पाहतां मोक्ष रेखा रे ॥४॥