भजनी मालिका
← भजनांकडे परत

अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासीचि येति चोजवितां

alabhya labh te satsangati | gharasichi yeti chojavitan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अलभ्य लाभ ते सत्संगती । घरासीचि येति चोजवितां ॥१॥ ज्याचे ध्यानीं मनीं देव । राहिला राव पंढरीचा ॥२॥ त्याहूनि अधिक् आहे कोण । काळहि आपण सेवा करी ॥३॥ निळा म्हणे तिष्ठती व्दारीं । होउनी कामारी रिध्दीसिध्दी॥४॥