भजनी मालिका
← भजनांकडे परत

आला तो सोपान वंदियले त्या पायी

ala to sopan vandiyale tya payi

आला तो सोपान वंदियले त्या पायी । पांडुरंगा ठायी मानियेला ॥१॥ रंजल्या गांजल्यांचा घेतला समाचार | संत माय थोर अनाथांची ॥२॥ आमची माय बाप भेटलीत आज । समाधान सहज अलिंगता ॥३॥ नामा म्हणे मज कळले याचे प्रेम । देवे केले श्रम काय गुणे ॥४॥