भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशासी गुंफा अंत नाहीं जिचा

akashasi gumpha ant nahin jicha

आकाशासी गुंफा अंत नाहीं जिचा । शोध करा तिचा सर्वभावें ॥१॥ अनंत ब्रह्मांडाचा खेळ जिच्या योगें चाले । चांग्यासी मिनलें तयां ठायीं ॥२॥ गुंफेच्या आधारें चंद्र सूर्य चालती । विश्रांतिसी येती तये जवळी ॥३॥ ज्ञानदेव नयन धरितां समभावें । सोहं स्वरुप भावें लाधलेंसें ॥४॥