भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशाचें अंतीं प्रणवाचें गुज

akashachen antin pranavachen guj

आकाशाचें अंतीं प्रणवाचें गुज । निरंजन बीज साधूं पाहाती ॥१॥ सद्रूप चिद्रूप अद्वय एक कळा । संसारीं वाहिला निर्विकार ॥२॥ प्रणवीं बीज अणुरेणु आंत । दशमद्वाराची मात अपूर्व बा रे ॥३॥ बापरखुमादेवी प्रणवे निखिळ । शब्दाचें पाल्हाळ प्रणवीं रीघे ॥४॥