भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा

akashache thayin chandra surya tara

आकाशाचे ठायीं चंद्र सूर्य तारा । सूक्ष्माचा फेरा सर्वा ठायीं ॥१॥ बिंदुस्थान तेथें ब्रह्मरंध्र ज्योती । तेथे योगी वसती दिवस रात्र ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वची हें शून्य । वस्तु परी पूर्णं सर्वाठायीं ॥३॥