भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं

akash jen dise drushtichiya potin

आकाश जें दिसे दृष्टिचिया पोटीं शून्यत्त्वासी घोटी चैतन्यांत ॥१॥ अर्थ पाहतां सांकडें ऐकतां । कैसें करुं आतां निवृत्ति सांगे ॥२॥ सांगतांची गुज देखिलें नयनीं । हिंडताती मौनी याची लागी ॥३॥ ज्ञानदेवाचा अर्थ कूटस्थ परिपूर्ण । पूर्णही अपूर्ण होय जेथें ॥४॥