भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकार उकार मकार करिती हा विचार

akar ukar makar kariti ha vichar

आकार उकार मकार करिती हा विचार । परिविठ्ठलु अपरंपर न कळे रया ॥१॥ संताचे संगति प्रेमाच्या कल्लोळा । आनंदें गोपाळामाजिं खेळे ॥२॥ बाळे भोळे भक्त गाताती साबडें । त्यांचें प्रेम आवडे विठोबासी ॥३॥ बापरखुमादेविवरु परब्रह्मपुतळा । तेथिल हे कळा निवृत्ति जाणे ॥४॥