भजनी मालिका
← भजनांकडे परत

आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें

akar nirakar vishvarupacha omkar | to ha sarveshvar balarupen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आकार निराकार विश्वरुपाचा ॐकार । तो हा सर्वेश्वर बाळरुपें ॥१॥ रांगणारांगतु हळुच पिलंगतुं । आनंदभरितु नंदराय ॥२॥ अंगणीं धांवतु सर्वेंचि बैसतु । अचोज दावितु भक्तालागीं ॥३॥ एका जनार्दनीं नित्य निरामय । न कळे वो माया काय बोलूं ॥४॥