भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा

aji vo kan ho krushna nahin ala | mhanoni khed kari gaulani bala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी वो कां हो कृष्ण नाहीं आला । म्हणोनि खेद करी गौळणी बाळा । काय हो ऐसा देहीं लागला चाळा । कां रे न येसी बाळा नंदाचिया ॥१॥ कवण देवा नवसी नवसू । कवणा गुरुतें मार्ग पुंसुं । कैसा भेटेल हा हृषीकेशु म्हणोनि । मन जाहलें उदासू ॥२॥ हा कृष्ण आजी कां घरी नये । आतां काय करुं यासी उपाय । एका जनार्दनी धरुं जाय पाय । तैच दरुशन होय आजी याचें ॥३॥