भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी सोनियाचा दिनु

aji soniyacha dinu

आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ हरी पाहिलारे हरी पाहिलारे। सबाह्यभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी ॥२॥ दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥३॥ बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥ कृपासिंधु करुणा कर । बापरखुमादेविवर ॥५॥ सदगुरु निवृत्तीनाथाचे प्रसादानें प्राप्त। झालेल्या स्थितीचा विचार।