भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित । मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो

aji puralen vo atinchen arat | hoten hradayin vo bahu divas chintit | mana avaruni indrayan satat | drushti pahon ha dhanivari gopinath vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आजि पुरलें वो आतींचें आरत । होतें ह्रदयीं वो बहु दिवस चिंतित । मना आवरुनि इंद्रयां सतत । दृष्टी पाहों हा धणिवरी गोपिनाथ वो ॥१॥ तेंचि घडोनियां आलें अनाययसें । जातां यशोदे घरा वाणचिया मिसें । आला खेळत खेळत बाळवेषें । कवळी घालि मिठी गदगदां हांसे वो ॥२॥ मुख अमृताचा मयंक उगवला । दंत हियाचा प्रकाश फांकला । नयनीं रत्पकीळ तारा वो चमकला । देखतां ह्रदयीं निजवास त्याचा झाला वो ॥३॥ जन्म जन्मांतरी बहु केले सायास । याचें भेटिलागीं व्रतें उपवास । सेविलीं गंगेची तटाकें उदास । त्याचिया सुकृताचे आले नेणों घोष वो ॥४॥ आजि आनंदाशी आनंद माझया झाला । आजि सुखशीं सुखें लाभ केला आजि हर्शाषीं हर्ष भेटों आला । तेणें श्रीरंग निजदृष्टी स्थिरावला वो ॥५॥ भोग भोगितां वो सरले समस्त । गेलें उडोनियां प्रारब्ध संचित । विटलें विषयावरुनियां चित्त । निळा म्हणे घडला हरिशीं एकांत वो ॥६॥