भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये

aji naval jhalen vo may | pahanya pahanya pahanen drushti dhaye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी नवल झालें वो माय । पाहण्या पाहण्या पाहणें दृष्टी धाये ॥१॥ ऐसा लाघवी सुखकर मूर्ती । संतसंगे जाली मज विश्रांती ॥२॥ योगीश्वर जया चिंतिती । सनकादिक जया ध्याती ॥३॥ योग साधनें नातुडे जो माये । एका जनार्दनीं कीर्तनीं नाचतु आहे ॥४॥