भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा

aji divali dasara | alon viththalache dvara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आजी दिवाळी दसरा । आलों विठ्ठलाचे द्वारा ॥१॥ पाहूनिया देव तीर्थ । आनंदें आनंद लोटत ॥२॥ नाठवें कांहीं आन दुजें । विठ्ठलावांचुनी मनीं माझें ॥३॥ आशा केलीं तें पावलों । एका जनार्दनीं धन्य जालों ॥४॥