भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी । अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी

aisiya begadi naka govun amhansi | anusaralon sevesi tumache namachintani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी । अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी ॥१॥ नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत । नेऊनियां घालित मुखीं काळाचे सर्व ॥२॥ नाना तर्कवाद भेदबुध्दी जल्पन । कैंचें समाधान तेथें दर्शन तुमचें ॥३॥ निळा म्हणे देखोनी ऐसें वाटतसे भय । न सोडूं ते पाय तुमचे सांपडले विटे ॥४॥ काय करुं तैसें ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥५॥ राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी अहंकार वाढे । न लगे वेडें वैराग्य तें ॥६॥