भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला

aisi vadhaliya sadvasana | tethen jirali manachi kalpana | indriyen vishay prana | bodh jala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसी वाढलिया सद्वासना । तेथें जिराली मनाची कल्पना । इंद्रियें विषय प्राणा । बोध जाला ॥१॥ लिंग विष्णु स्वप्न कंठस्नान । काल्पनिक भोग जाण । वाचा मध्यमा ऐसी खूण । मिळोनि ठेली त्या पदा ॥२॥ तेथें इंद्रिया ऊर्वसी । आलीया सेजेसी । जयाचिया मानसीं । कामा नुठी ॥३॥ एका जनार्दनीं बोध । अवघा झाला ब्रह्मानंद । लिंग देहाचा खेद । वस्तु जाला ॥४॥