भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा । न करुनी कांही धंदा सर्वहि करी

aishiyache gharin aisichi mi sada | na karuni kanhi dhanda sarvahi kari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐशियाचे घरीं ऐसीचि मी सदा । न करुनी कांही धंदा सर्वहि करी ॥१॥ सदाचि निष्काम सदा मी मी सकाम । सद रुप नाम नूतन माझें ॥२॥ सदा नाहींपणें सदा माझें जिणें । सदा होणें निमणें माझा वांटा ॥३॥ निळा म्हणे ऐसें बोले मायादेवी । अबोलण्याची गांवीं वसोनियां ॥४॥