भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें कीर्तीचें पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे

aisen kirtichen povade | jahale brahmadik vede

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसें कीर्तीचें पोवाडे । जाहले ब्रह्मादिक वेडे । श्रुतीशास्त्रां कुवाडे । न कळे कांहीं ॥१॥ तो परात्पर श्रीहरी । पुंडलिकांचे उभा द्वरीं । युगें अठ्ठाविसे जाहलीं परीं ॥ न बैसे तरी खालुता ॥२॥ धरुनी भक्तीची मर्यादा । आहे पाठीपागें सदा । एका जनार्दनीं छंदा । विटेवरी उभाची ॥३॥