भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें जे धाले पुर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनियां

aisen je dhale purna nimale | te nahin ale paratoniyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐसें जे धाले पुर्ण निमाले । ते नाहीं आले परतोनियां ॥१॥ घडीनें घडी चढतसे गोडी । अखंड आवडी संतापायीं ॥२॥ सांडोनियां काम स्मरे रामनाम । अंतरीं तें प्रेम धरुनियां ॥३॥ एका जानर्दनीं रंगलें नामीं । तया वंदुं आम्हीं सर्वभावें ॥४॥