भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें हें अंडज सांगितलें देवें

aisen hen andaj sangitalen deven

ऐसें हें अंडज सांगितलें देवें । सांगोनिया भावें गिळियेलें ॥१॥ गिळिला प्रपंच समाप्ति इंद्रियां वैष्णवी हे माया बिंबाकार ॥२॥ निरशून्य शून्य साधूनि उपरम । वैकुंठीचे धाम ह्रदय केलें ॥३॥ जिव शिव शेजे पंक्तीस बैसली । पंचतत्वांची बोली नाहीं तेथें ॥४॥ तत्त्वीं तत्त्व गेलें बोलणें वैखरी वेदवक्ते चारी मान्य झाले ॥५॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्ति तुष्टला । सर्वागें दीधला समबोध ॥६॥