भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे

aise dev ani rusheshvar | harsha houniyan nirbhar | nandayashodechen varanvar varniti bhagya nijamurkhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्ष होऊनियां निर्भर । नंदयशोदेचें वारंवार वर्णिती भाग्य निजमुर्खे ॥१॥ न संपडे जो योगसाधने । नाना तपें वेदाध्ययने । तो हा सगुणरुपें नारायण । क्रिडा करी याच्या घरीं ॥२॥ यावरी गौळणीही अति सुंदरा । कडिये घेउनी शारंगधरा । नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबने देऊनि खेळविती ॥३॥ म्हणति कृष्णा रामा मेघ:शामा । योगी मुनिजन मनोरमा । सुलभ झालासी आजि तूं आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥४॥ पूर्वाजिंतें उत्तमें होती । सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती । मोडोनी आलिया तुझीं हू मूर्ती । डोळेभरी अवलोकूं ॥५॥ ऐशिया उत्साहे त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा । मग पावोनियां परमानंदा । शयनीं पर्यंकीं निजविती ॥६॥ निळा म्हणे सुख विश्रांति । पावल्या ऐशिया सत्संगती । पुढील कथा अपूर्व ख्याती बाळपणींचीं हरिकीर्ती ॥७॥