भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला । देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला

aisa nila nityanandi nimagna kela | deuniyan namasmaran charanin sthapila

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला । देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला ॥१॥ तेणें ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी । आठवूनि रुप तुमचें हदयमंदिरीं ॥२॥ नेणें आपपर नेणे जन विजन । नेणोनियां कांहीचि नुरवी देहाचें भान ॥३॥ निळा म्हणे हाचि माझा ऐश्वर्य भोग । काया वाचा मानस अवघा पांडुरंग ॥४॥