भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐक्यरुपें हरिहर । उभा कटींकर विटेवरीं

aikyarupen harihar | ubha katinkar vitevarin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ऐक्यरुपें हरिहर । उभा कटींकर विटेवरीं ॥१॥ तो म्यां देखिेयेला दिठीं । भूवैकुंठी पंढरीये ॥२॥ तुळसीमाळ वैजयंती । वेढिला संतीं मुनिवरीं ॥३॥ निळा म्हणे विश्रांती मना । झालें लोचना पारणें ॥४॥