भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनियां कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचें

aikoniyan kantechen vachan | chittasamadhan sudamyachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनियां कांतेचें वचन । चित्तसमाधान सुदाम्याचें ॥१॥ म्हणतसे भेटी रिक्तहस्तें नवजावें । हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे ॥२॥ देव द्विज गुरु या तिघांचें दरुशन । रिक्तपणें जाण न घ्यावें जी ॥३॥ एका जनार्दनीं करुनी विचार । भेटीचा निर्धार बाणलासे ॥४॥