भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली

aikoni sitechya uttarin | purnavastha mandodari | chadhali svedakamp shariri | anandalahari datali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥ इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥ बाप सदगुरुचें सामर्थ्य । अलोकिक अति अदभुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥ नाहीं हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनामात्रें दिधलें सुख । एका जनार्दनीं सरेना ॥४॥