भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणें । म्हणें कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर

aikoni krushnachen bolane | uddhav santoshala tenen | mhanen krupa karuni maj dakhavanen | bhaktanche mandir

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ऐकोनी कृष्णाचें बोलणे । उद्धव संतोषला तेणें । म्हणें कृपा करुनी मज दाखवणें । भक्तांचे मंदिर ॥१॥ मग धरुनी उद्धवाच्या हात । स्वयें दावी श्रीकृष्णानाथ । आणिकांसी नोहे तें प्राप्त । हरिभक्ताविण ॥२॥ देवें देवघर उघडिलें । सन्मुख उद्धवा बैसविलें । देव सांगतसे वहिलें । तया उद्धवाप्रति ॥३॥ एका जनार्दनीं प्रेम । भक्तांचें ऐकतां नाम । प्राणी होती निष्काम । अहर्निशीं जपतां ॥४॥