भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐके तूं ज्ञान सुख विश्रांति रुपा

aike tun dnyan sukh vishranti rupa

ऐके तूं ज्ञान सुख विश्रांति रुपा । हरिरुप दीपा पाहे ऐसा ॥१॥ चित्तवृत्तिचिया आदिमध्य अंतीं । रुपींरुप आनंदीं समरसें ॥२॥ निवृत्ति सांगे ज्ञाना योगाचि धारणा । जीवशिव करणा चक्षु दृष करी ॥३॥