भजनी मालिका
← भजनांकडे परत

आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा

aika ho sant tumhi muneshvar | majhiye nirdhar antarincha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आईका हो संत तुम्ही मुनेश्वर । माझिये निर्धार अंतारींचा ॥१॥ विठोबावांचूनि न मनींचि दैवत । न धरी माझें चित्त भाव कोठें ॥२॥ काय मतांतरें करुं ते साधनें । हरीनामकीर्तनें वांचूनियां ॥३॥ निळा म्हणे न लगे वायूची धारण । तत्वसंख्या कोण कामा आली ॥४॥